बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    1. राज्यातील लोणारी समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
    2. लोणारी समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे.
    3. लोणारी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
    4. लोणारी समाजासाठी कृषी उत्पादन, वस्त्र, साहित्य आणि सामग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटेल अशी सेवा देणे.
    5. राज्यातील लोणारी समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
    6. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या सर्व योजना राबविणे.